breaking-newsराष्ट्रिय

सहाय्यक प्राध्यापकपदी पीएचडीधारकांची थेट नियुक्‍ती

प्रकाश जावडेकर : 2021 पासून होणार नियमाची अंमलबजावणी 
नवी दिल्ली – महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नियुक्ती आणि प्रमोशनसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता सहाय्यक प्राध्यापकपदी पीएचडी धारकांची थेट नियुक्‍ती करण्यात येणार आहे. या नियमाची अंमलबजावणी 2021पासून करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

आतापर्यंत महाविद्यालयीन प्राध्यापक होण्यासाठी पदवी परीक्षेसह नेट, सेट किंवा पीएचडी करणे बंधनकारक होते. मात्र या नियमात बदल करत पीएचडी बंधनकारक करण्यात आली आहे. म्हणजेच फक्त नेट किंवा सेटच्या पात्रतेवर आता महाविद्यालयीन प्राध्यापकांची नियुक्ती होणार नाही. 2021 पासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.
महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ही नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. यामुळे प्राध्यापकांचा कल विद्यार्थ्यांच्या शिकवण्याकडे राहिल, असे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांना पदोन्नतीसाठीही पीएचडी बंधनकारक असेल. विद्यापीठांतील नव्या नियुक्‍त्या पीएचडीधारकांनाच दिल्या जाणार आहेत. ज्या प्राध्यापकांकडे सध्या पीएचडी नाही, त्यांना तीन वर्षांचा वेळही देण्यात आला आहे. 2021 पर्यंत असिस्टंट प्रोफेसर असलेल्या सर्व प्राध्यापकांना पीएचडी मिळवणे बंधनकारक आहे.
दरम्यान ज्या भारतीय विद्यार्थ्यांनी देशाबाहेरील 500 सर्वोत्तम विद्यापीठांतून पीएचडी मिळवली आहे. ते विद्यार्थी भारतातील कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी पात्र असतील.

महाविद्यालयीन शिक्षकांना शैक्षणिक कामगिरी निर्देशक (एपीआय) अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे ते विद्यार्थ्यांना शिकवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील. यामागे उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आणि देशात सर्वोत्कृष्ट प्रतिभा निर्माण करण्याचा हेतू आहे.
प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button