breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

जनतेच्या ‘कल्याणा’साठी भाजपचा ‘हा’ नेता बांधणार ‘घड्याळ’

राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आणखी एक नेता जाण्याच्या चर्चांना उत

मुंबई | प्रतिनिधी

भाजपाचे नेते कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसले. विशेष म्हणजे आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असंही काळे या वेळी म्हणाले. त्यामुळे काळे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. भाजपा नेते कल्याणराव काळे आणि शरद पवार शुक्रवारी सरकोली येथे झालेल्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेल्या भाषणाचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

राज्यातील सत्तांतराला वर्षपूर्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय स्थलांतराला सुरूवात झाली आहे. अलिकडेच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. त्याचबरोबर भाजपाचे काही आमदार पक्षातून बाहेर पडणार असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. त्यातच भाजपाचा आणखी एक नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

 “आपण यापुढे शरद पवार जे सांगतील, त्या पध्दतीने काम करू. शरद पवार यांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले आहेत. आमच्यापण काही चुका झाल्या. परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल, चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार आहे,” असं कल्याणराव काळे भाषणात म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button