breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिनी खडसे यांची टीका : महिलांचे प्रश्न ‘रिल्स’ टाकून सुटणार नाहीत!

पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदार संघात शरद पवार गटाची मोर्चेबांधणी

पिंपरी : महिलांचे प्रश्न ‘रिल्स’ टाकून सोडवू शकत नाहीत त्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे सारखे ‘रिअल स्टार्स’ बनावे लागते, अशी टीका महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली आहे.

चिंचवड, भोसरी आणि पिंपरी तीनही विधानसभेमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई यांचा झंझावती दौरा झाला. यावेळी युवक शहर अध्यक्ष इम्रान भाई शेख, प्रदेश सरचिटणीस राजन नायर, युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, संदीप चव्हाण, सचिन निंबाळकर, राजेश हरगुडे, विश्रांती पाडाळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष स्वप्नाली असोले, भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष सारिका हरगुडे, अश्विनी आगळे, पंचशीला आगळे, सुजाता पाटील नाजुका वाल्हे,हनीफ शेख, रेखा मोरे,अलका खंडागळे, प्राची ससाने, संगीता अवधूते, जयश्री झेंडे, जोशना बैध, आणि मोठ्या संख्येने महिला व युवक पदाधिकारी उपस्थित होते.

रोहिणी खडसे म्हणाल्या की, “राज्यातील महिलांचे प्रश्न सोशल मीडियावर रिल्स टाकून सुटू शकत नाहीत.तर त्यासाठी आधी शरद पवार साहेब,सुप्रिया ताई सारखे लोकांच्या मनातील रिअल स्टार्स बनावे लागते अशी जोरदार टीका विरोधकांवर केली. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कसे काम करावे यावर मार्गदर्शन केले.

वाढती महागाई,बेरोजगारी,महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराविरोधात विरोधकांना योग्य त्या भाषेत उत्तर देण्यास पुढे मागे बघू नका अश्या सूचना देखील महिला पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पन्नास वर्षाच्या कालखंडात महिला सक्षमीकरण धोरणामुळेच आज महाराष्ट्रात महिलांना सन्मानाने वागणूक मिळत असल्याचे देखील यावेळी सांगितले.यावेळी त्यांनी महिला शहर अध्यक्ष आणि त्यांच्या टीमच्या कामाचे देखील कौतुक केले.

हेही वाचा – ‘मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल’; आशुतोष गोवारीकर

सांगवीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित “जागर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा” शिव व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. युवक सरचिटणीस मेघराज लोखंडे व ॲडव्होकेट प्रियाताई देशमुख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. रोहिणी खडसे यांनी खानदेश भागातील शहरात वसलेल्या प्रमुख लोकांच्या देखील गाठीभेटी घेतल्या. शहरात सर्व ठिकाणी ठिकाणी महिला प्रदेशाध्यक्ष यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

‘मी सावित्री बोलते’ प्रयोगाचे सादरीकरण…

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महिला शहर अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तीनही विधानसभेत कार्यक्रम राबवले गेले.चिखली येथे भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष सारिका हरगुडे यांनी उत्तम कार्यक्रमाचं आयोजन केलं.विविध क्षेत्रांमधील काम करणाऱ्या २०० स्त्रियांना “सन्मान स्त्री शक्तीचा” या कार्यक्रमातून सन्मानित केले. तर सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पिंपरी येथे ज्येष्ठ सामाजिक प्रबोधनकार शारदाताई मुंडे यांचे “जागर सावित्रीच्या लेकींचा” हे व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘मी सावित्री बोलते’ हा एक पात्री प्रयोग सादर केला. तसेच अनेक महिलांचा सन्मान देखील करण्यात आले. यावेळी मा उपमहापौर विश्रांतीताई पाडाळे यांना प्रदेश सचिवपदी, तर शोभाताई साठे यांची पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button