breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘ससून’ला कोरोना प्रोटोकॉलसाठी राज्य शासनाची परवानगी मिळावी, राष्ट्रवादी कार्यकर्ते संदीप काटे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी| महाईन्यूज| प्रतिनिधी

सध्या पुणे शहरातील ससून रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांचे हॉटस्पॉट ठरत आहे. मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण पुणे शहरातील इतर रुग्णालयांपेक्षा या रुग्णालयात अधिक आहे. मात्र, सर्वाधिक अनुभवी व तज्ञ डॉक्टरांची फौजदेखील या रुग्णालय प्रशासनाकडे आहे. स्वाईन फ्लूच्या साथकाळात ससूनमधील तज्ञ डॉक्टरांनीच तयार केलेले ‘ स्वाईन फ्लुचे ‘ प्रोटोकॉल जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केले होते. या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची कमतरता नाही. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामास जुंपन्याचे कसब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली आणि पालकत्वाखाली असणारे जिल्हातील एकमेव ससून रुग्णालय व यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी समन्वय साधावा. तसेच जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर रामबाण अथवा प्रतिबंधात्मक सुरक्षा मानक प्रस्थापित करण्यासाठी ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्णालयाच्या तांत्रिक समितीने ‘ स्वाईन फ्लु’ च्या धर्तीवर तयार केलेल्या ‘ कोरोना प्रोटोकॉल’ ला मान्यता मिळावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान काटे यांनी ई – मेलद्वारे मागणी केली आहे.

यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यावर सध्या कोरोनाचं संकट असून, त्याचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र करोना संकटाचा सामना करताना रुग्णांवरील उपचार, डॉक्टर व परिचारिकांना घ्यायची दक्षता, विलगीकरण, औषधांचे डोस, विविध उपाययोजना आदींबाबत ‘कोरोना प्रोटोकॉल’ ची अधिक आवश्यकता भासू लागली आहे. २००९ मध्ये स्वाइन फ्लूमुळे पहिल्या मृत्यूची नोंद पुण्यात झाली होती. स्वाईन फ्लूच्या साथकाळात ससूनमधील तज्ञ डॉक्टरांनी तयार केलेले स्वाईन फ्लुचे प्रोटोकॉल जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले होते. त्याआधारे पुढे राज्य शासनानेही स्वाईन फ्लुच्या उपचारांसंदर्भात अंतिम प्रोटोकॉल तयार केला. स्वाईन फ्लुची साथ आटोक्यात आणण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेला हा प्रोटोकॉल अधिक प्रभावी ठरला.

मागच्या यशस्वी अनुभवाच्या जोरावर ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोनासाठीही प्रोटोकॉल तयार करण्याचे काम हाती घेतले होते. प्रोटोकॉल नुकताच तयार झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने उपचार पध्दत, रुग्णांवर प्रकृतीनुसार औषधोपचार, विलगीकरण कक्षात जाताना वैद्यकीय कर्मचा-यांनी घ्यावयाची दक्षता, कोणत्या रुग्णांची चाचणी घ्यावी, त्याचे अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजना, अतिदक्षता कक्षातील सुविधा तसेच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर अंतिम संस्कार कसे करावेत या बाबीचा त्यात समावेश आहे.

मात्र, राज्य शासनाकडून अद्याप त्यावर मोहर उमटली नाही. त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन ‘कोरोना प्रोटोकॉल ‘ अंतिम मंजुरीसाठी पुढाकार घ्यावा. राज्य शासनाने त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर हा प्रोटोकॉल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे जाईल, मात्र त्याची अंमलबजावणी देखील तितकीच महत्वाची आहे. त्यासाठी अजितदादांची भूमिका महत्वाची आहे. तसेच ससून रुग्णालयातील वाढत्या कोरोना रुग्णांची मृत्यूची संख्या देखील चिंतेची बाब आहे. यासाठी उपाययोजना महत्वाच्या आहेत. त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन येथील डॉक्टर रुग्णालय प्रशासनासोबत बैठक घ्यावी, असे या निवेदनात काटे यांनी म्हटले आहे.

स्वाईन फ्लुच्या धर्तीवर कोरोनासाठी प्रोटोकॉल तयार करण्याचे काम ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्णालयाच्या तांत्रिक समितीने हाती घेतले होते. प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे. नुकताच हा प्रोटोकॉल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाने त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे जाईल. कोरोनावरील उपचारपध्दतीसाठी आवश्यक उपाययोजनांचा त्यामध्ये समावेश आहे.
– डॉ. अजय चंदनवाले (अधिष्ठाता, ससून रुग्णालय).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button