breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात आज कोरोनाचे तीन‌ नवीन रुग्ण, पालिकेने हे रस्ते केले बंद

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत नवीन ३ ने वाढ होऊन दाखल झालेल्या रुग्णांची संख्या १४ झालेली आहे. त्यामुळे शहरामध्ये आजपर्यंत एकुण २६ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. यापैकी १२ रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित १४ रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल असून रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचेवर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने याकामी चांदणी चौक (पी . एम . टी . चौकाजवळ), भोसरी (पंजा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स – भोसरी मेन रोड – मॅन्जिनिस केक शॉप – मेघना सोनोग्राफी सेंटर – लांडेवाडी रोड मनपा भोसरी करसंकलन कार्यालय – भगवान गव्हाने चौक – लोंडे गिरणी – विनय सुपर मार्केट – आई तुळजा भवानी मंदीर – मारुती मंदीर – पुजा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स ) क्रांतीवीर नगर , थेरगांव गावठाण मधील खालील भाग ( रहाटणी लिंक रोड वरील स्वस्तिक डायमंड आपार्टमेंट. रहाटणी लिंक रोड – आस्था मेडिकल स्टोअर – तेथुन आत हॉटिल सिल्वर ९कडे जाणारा रोड – हटिल सिल्वर ९ . ए विंग एस ऑरा सोसायटी रहाटणी लिंक रोड वरील स्वस्तिक डायमंड आपार्टमेंट ) तसेच डांगे चौक ते आदीत्य बिर्ला रुग्णालय चौक ते तापकीर चौक ते काळेवाडी फाटा चौक ते डांगे चौक या चौका दरम्यान असलेल्या रस्त्यांवरील आवागमन फक्त अत्यावश्यक सेवांकरिता चालु ठेवणे. दिघी गावठाण स्कायलाईन सोसायटीच्या चतुःसीमा ( हॉटेल द्वारकाधीश – ओम सुपर मार्केट – फेज ३ रोड – ओम साई नर्सरी – श्री . साई हॉस्पिटल – हॉटेल द्वारकाधीश ) हा भाग आज शुक्रवार , दि . १० एप्रिल , २०२० रोजी रात्री ११ . ०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करणेचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तसेच सदर परिसरातील संबंधित पोलिस स्टेशन प्रमुख यांचे मार्फत सदर भागाच्या हद्दी सील करणे आवश्यक आहे . तसेच सदर परिसरांच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करणे , सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे . तसेच पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची आजपर्यंतची संख्या १९२२ असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी ब आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यंत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे.

तसेच सुचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांबर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून सूचनांचे उल्लंघन करणा – या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील १४ दिवसांपर्यंत संस्थात्मक अलगीकरण (कारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button