breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत करोनाचे ९९३ रुग्ण; दिवसभरात १० जण दगावले

मुंबई | महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना राजधानी मुंबई करोनाचा केंद्रबिंदू बनला आहे. मुंबईत आज करोनाचे नवीन २१८ रुग्ण आढळले असून १० जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईत आतापर्यंत करोनाची लागण होऊन ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील करोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आज २१८ नवीन रुग्ण आढळल्याने मुंबईत आता ९९३ करोनाबाधीत रुग्ण झाले आहेत (६४ मृत्यू मिळून). दुसरीकडे दाखल रुग्णांपैकी आणखी चार रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण ६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज करोना सदृष्य लक्षणे असलेले २९२ नवीन रुग्ण दाखल झाले असून अशा रुग्णांची संख्या आता ४ हजार ३५ इतकी झाला आहे. मुंबईत आज करोनाबाधीत २१८ नवीन रुग्ण आढळले असले तरी त्यापैकी ६० टक्के रुग्णांमध्ये आता लक्षणे नाहीत. ते प्रतिबंधात्मक क्षेत्रातील करोना रुग्णांच्या सहवासीतांपैकी आहेत, असा दावा पालिकेने केला आहे. दिवसभरातील १० मृतांपैकी ९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, असेही पालिकेने नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button