breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराच्या आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी पडझड

सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराच्या आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी पडझड झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ९५० अंकांची घसरण झाल्यामुळे बाजारात लोअर सर्किट लावण्यात आले. यामुळे राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहार ४५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात अर्थात सेन्सेक्समध्ये शुक्रवारी बाजार उघडताच घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीच्या पडझडीनंतर दोन्ही शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदी करण्याला काहीसा उत्साह दाखविल्यामुळे निर्देशांक सावरण्यास मदत झाली.

कोरोना व्हायरसचा जगभरात होत असलेले संक्रमण याचा धसका जगातील सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांनी घेतला आहे. त्यामुळेच बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा पैसा काढून घेण्यालाच त्यांच्याकडून प्राधान्य दिले जात आहे. बाजारात गुंतवणूक करण्याला कोणीच उत्सुक नसल्यामुळे शेअर बाजारांच्या निर्देशांकात घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. गुरुवारीही सेन्सेक्समध्ये सुमारे ३००० अंकांनी घसरण झाली होती. शुक्रवारी घसरणीचा ओघ कायम राहिला.

निफ्टीमध्ये लोअर सर्किट लागल्यामुळे ४५ मिनिटे व्यवहार स्थगित करण्यात आले होते. ४५ मिनिटांनंतर पुन्हा व्यवहार सुरू होतील. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारांच्या निर्देशांकात घसरणच होत असल्याचे दिसते आहे. मोठे गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेण्यालाच प्राधान्य देत आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button