breaking-newsपिंपरी / चिंचवड

कष्टकरी जनतेला जेवण मिळावे यासाठी प्रयत्न करू : आमदार महेश लांडगे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड ही कामगार कष्टकऱ्यांची नगरी आहे covid-19 कोरोना मुळे सर्व व्यवसाय बंद आहेत त्यामुळे तळ हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कष्टकरी जनतेचे हाल होत आहेत.
गोरगरीब कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये यासाठी सर्व कष्टकरी कामगारांना जेवण मिळावे यासाठी कष्टकरी कामगार पंचायतीच्या सुरू केलेले अन्नछत्रास पूर्ण मदत सहकार्य करण्यात येईल, असे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

रिक्षाचालक टपरी पथारी हातगाडी धारक, धुणीभांडी, स्वयंपाक, साफसफाई काम करणाऱ्या महिला कागद-काच-पत्रा वेचक महिलांसाठी कष्टकरी कामगार पंचायत वतीने अन्नछत्र (किचन) सुरू करण्यात आले आहे, यास आमदार महेश लांडगे यांनी भेट दिली. आणि गरीब कष्टकऱ्यांना जेवण वाटप केले.

यावेळी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, उद्योजक दिंकेश तिलवानी, रिक्षा संघटनेचे नेते तुषार लांडगे, लक्ष्मण शेलार आणि आदी उपस्थित होते.

यावेळी महेश लांडगे यांनी शहरातील रिक्षाचालक फेरीवाले बांधकाम मजूर या सर्व कष्टकरी जनतेची covid-19 मुळे पार्श्वभूमीवर काय परिस्थिती आहे. त्यांना आपण काय मदत केली पाहिजे, कोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत, याबाबत कष्टकरी कामगार पंचायत कार्यकर्त्यांनकडून माहिती घेत प्रश्न समजून घेतले. गोरगरिबांचे प्रश्न समस्या सोडवून त्यांच्यासाठी योग्य त्या उपयोजना करू असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध उपयोजना बाबत माहिती देखील दिली, आणि काही कमतरता राहत असेल तर माहिती दया, प्रशासनास योग्य त्या सूचना देण्यात येतील असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button