breaking-newsपुणे

विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

घरगुती कारणांवरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील घटना ही 3 डिसेंबर 2017 ते 5 फेब्रुवारी 2020 या कालावधीत चिखली येथे घडली. पती अविनाश जालिंदर पवार, सासू संगीता जालिंदर पवार, सासरे जालिंदर साहेबराव पवार (सर्व रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी 24 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, ८० हजार रुपये रोख रक्कम आणि बुलेट गाडी घेऊन ये, अशा रीतीने मला प्रत्येक वेळी मानसिक त्रास देत असल्याचे पिडीतेने तक्रारीत म्हंटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना घरगुती कारणावरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला. आरोपी सासूने फिर्यादी यांना न सांगता त्यांच्या माहेरी जाऊन बुलेट घेण्यासाठी 80 हजार रुपये आणले. फिर्यादी यांचे वडील घरी आले असता त्यांनाही शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button