breaking-newsआंतरराष्टीय

सरकारमधील महिलांच्या अधिक सहभागाने भ्रष्टाचाराला आळा-अहवाल

वॉशिंग्टन (अमेरिका)- सरकारमधील महिलांच्या अधिक सहभागाने भ्रष्टाचाराला आळा बसत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. 125 पेक्षा अधिक देशातील जनप्रतिनिधींचा अभ्यास केल्यानंतर एका सर्वेक्षणाने दावा केला आहे, की ज्या देशांत जनप्रतिनिधींमध्ये महिलांची सहभाग अधिक असतो, त्या देशांत भ्रष्टाचाराचे प्रंमाण कमी असते. “जर्नल ऑफ इकॉनॉमिक बिहेवियर अँड ऑर्गनायझेशन’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे.
स्थानिक राजनीतीतही महिलांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे. युरोपमध्ये ज्या ज्या ठिकाणी स्थानिक राजनीतीत महिलांची संख्या अधिक आहे, त्या त्या ठिकाणी लाचखोरेचे प्रमाण फार कमी आहे.
या अभ्यासातून महिलांचे सशक्तीकरण, नेतृत्वाच्या भूमिकेत त्यांचे अस्तित्व आणि सरकारमधील त्यांचे प्रातिनिधित्व अधोरेखित होते, असे व्हर्जिनिया टेकमधील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका सुदिप्ता सारंगी यांनी म्हटले आहे. महिला, मुले आणि कुटुंबे यांच्या कल्याणाशी निगडित धोरणे या महिला नेत्यांची धोरणे असतात, असे ली मो यने कॉलेजमधील चंदन झा यांच्यासह अनेक संशोधकांचे अनुमान्‌ आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button