breaking-news

अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

सोलापूर | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचं आज सकाळी ११.४५ वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या ६५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.

मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत त्यांनी फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच १९९६मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. त्यानंतर त्या अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या.

नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. २००१पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. २००८पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदार्‍या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button