पिंपरी / चिंचवड

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने गरोदर पत्नीला मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे न दिल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. पत्नी आणि तिच्या पोटातील बाळाच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झाला. याबाबत पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 25) रात्री साडेबारा वाजता म्हातोबा नगर झोपडपट्टी वाकड येथे घडली.

राजेंद्र काशिनाथ वाडघरे (वय 32, रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु फिर्यादीकडे पैसे नसल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून केसांना धरून दरवाज्याकडे ओढत नेले. फिर्यादिच्या कमरेत जोरात लाथ मारली. फिर्यादीने दरवाजाला पकडल्याने त्या पडता पडता वाचल्या. उंब-यावरून पडून फिर्यादी आणि त्यांच्या पोटातील बाळाच्या जीवाला धोका निर्माण होईल हे माहिती असताना आरोपीने फिर्यादीच्या कमरेत लाथ मारली. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button