breaking-newsपिंपरी / चिंचवड

जागतिक पर्यावरण दिन ; पर्यावरण संरक्षणासाठी प्रतिकात्मक रॅलीतून संदेश

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  ‘जगा व जगू द्या’ या संकल्पनेतून निगडी येथे पर्यावरण बचावाची रॅली काढण्यात आली. या रॅलीतील प्रतिकात्मक संदेश देवून पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

या रॅली लहान मुले घोषणा देत होती . “ज्येष्ठ जागे व्हा आम्ही झाडे लावतो तुम्हीही लावा “, या रॅली चे दुसरे अनोखे वैशिष्टय असे होते की की या रॅलीत एक प्रतिकात्मक संदेश वाहक गाढव सामील झाले . मी पालिका,माझी पाठ थोपटा, लाखो किमतींची झाडे तोडणाऱ्या ना किरकोळ दंड घेवून मी (पालिका)सोडून देते आणि तेही लाकडा सहित , माझे कौतुक करा ! हा संदेश घेवून जात होते ! हे गाढव, आलेल्या प्रत्येक कडून आणि दुकाना दुकानात जावून पालिकेची पाठ थोपटून घेत होते !

या पथ नाट्यात मारुती राया काही केल्या पूजा स्वीकारत नव्हते ! भक्तांनी मनधरणी केल्यावर भक्तांची कान उघाडणी करताना मारुतीराया म्हणत होते ” मूर्ख माणसा ,मला प्रसन्न् व्हायचे असेल तर मी निसर्गाच्या माध्यमातूनच होणार आणि तुम्ही निसर्गाचं ठेवला नाही ! मला प्रसन्न होण्याचे मध्यांच तुम्ही ठेवले नाही! मी कसा प्रसन्न होवू? आणि मग भक्त निसर्ग संवर्धनाचे अभिवचन मारुती राया ला देत होते ! देव नाही दगडात वास करतो झाडात!मंदिरे नाही झाडे वाचवा ! या घोषणांनी आकाश दुमदमून जात होते आणि मारुती राया प्रसन्न होत होते !

“अंत्य विधी साठी विद्युत दहिनीचा वापर करा “हा संदेश सुध्दा देण्यात आला ! बाल मंडळीतील सिध्दार्थ,अभिषेक,हृषिकेश,ओमकार,गणेश, दीप, रोहित, भालचंद्र, कार्तिक इतर बाल मंडळीं आणि जगा व जगुद्या चे प्रवर्तक डॉ संदीप बाहेती सहकारी संदीप रांगोळे यांनी नियोजन केले.

यावेळी सचिन शिंदे, जगदीश मुंदडा , प्रदीप शाळिग्राम, डॉ सुमित लाड ,अभिषेक सदानी , महेश सांस्कृतिक मंडळ पदाधिकारी आणि इतर निसर्ग मित्रांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button