breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

सरन्यायाधीशांनी भाजपला झापलं : राजकीय पोळी भाजण्यासाठी कोर्टाचा वापर करू नका

दिल्ली | महाईन्यूज

पश्चिम बंगालमध्ये कथितरित्या होत असलेल्या राजकीय हत्यांविरोधातील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी भाजपा आणि पश्चिम बंगाल सरकारला चांगलेच झापले. ”राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोर्टाचा वापर करू नका, हेच करायचं असेल तर टीव्ही चॅनेल्सवर जा.” असं सणसणीत उत्तर सरन्यायाधीश बोबडे यांनी दिले आहे. भाजपाचे प्रवक्ते गौरव बन्सल यांनी पश्चिम बंगालमध्ये कथितरित्या होत असलेल्या राजकीय हत्यांविरोधातील याचिका केली आहे. त्यावर सोमवारी सुनवाणी झाली आहे.

भाजपाच्या वतीनं ज्येष्ठ वकील गौरव भाटिया बाजू मांडत होते, तर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टात उभे होते. या याचिकेला कपिल सिब्बल यांनी विरोध केला. एखादा राजकीय पक्ष याचिका करू शकते का, हे कोर्टानं तपासावं, असं कपिल सिब्बल यांचं मत होतं. त्यावर सरन्यायाधीश बोबडे म्हणाले, आम्हाला कल्पना आहे की दोन्ही बाजूचे लोक राजकीय पोळी भाजण्यासाठी कोर्टाचा वापर करत आहेत. असं काही करण्यापेक्षा तुम्ही टीव्ही चॅनेल्सवर जा. तेथे तुम्हाला जी प्रसिद्धी मिळवायची ती मिळवा. अस ठणकावून सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button