breaking-newsपिंपरी / चिंचवड

सफाई कामगार मृत्युप्रकरणी ठेकेदारावर ‘अ‍ॅट्रोसिटी’ दाखल करा

  • राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने घेतली याची दखल
  • पिंपरी-चिंचवड पोलिस आणि महापालिका आयुक्त यांना दिले आदेश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

नालेसफाई करताना सफाई कामगार मृत्युमुखी पडल्याप्रकरणी कंत्राटी ठेकेदारावर अ‍ॅट्रोसिटी दाखल करा, असे आदेश राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने याबाबतची नोटीस नवनियुक्त पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बजावली आहे. २०१७ मध्ये दोन विविध घटनांमध्ये नालेसफाई करताना भारत डावखर आणि बाळू सोनवणे यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. तथापि, दोन्ही सफाई कामगार अनुसुचित जातीचे असल्यामुळे कायद्यानुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रोसिटी) आणि हाताने मैला उचलणे प्रतिबंधक व सफाई कामगार पुनर्वसन कायदा २०१३ अंतर्गत गुन्हे दाखल करणे आवश्यक होते. मात्र, या दोन्ही प्रकरणात जुजबी गुन्हे नोंदविण्यात आले. महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

याविरोधात आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सागर चरण यांनी राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाकडे दाद मागितली. त्याची दखल घेत १५ दिवसात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना दिले आहेत. याबाबत अ‍ॅड. सागर चरण म्हणाले, भारत डावखर आणि बाळू सोनवणे या दोन्ही दिवंगत कामगारांच्या कुटुंबियांना महापालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपये मिळवून दिले आहेत. मात्र, त्यांना घर द्यावे, नोकरी द्यावी, मुलांना मोफत शिक्षण द्यावे, त्यांचे पुनर्वसन करावे असे आदेश राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे संचालक कौशल कुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.          

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button