हिंदीच्या राजकारणामुळे दक्षिण भारतीय पंतप्रधानपदापासून वंचित : कुमारस्वामी
नवीन शिक्षण धोरणाच्या घोषणेनंतर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये हिंदी भाषेचा विरोध वाढला आहे. डीएमकेच्या खासदार कनिमोझींच्या ट्विटनंतर सोमवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनीही आरोप केले. कुमारस्वामी अनेक ट्विट करत म्हणाले, हिंदीच्या राजकारणामुळेच देवेगौडा, करुणानिधी आणि कामराज यांसारख्या दक्षिण भारतीय नेत्यांना पंतप्रधान होण्यापासून वंचित राहावे लागले. यात देवेगौडांनी अनेक वेळा अडचणींवर मात केली.
मात्र भाषेमुळे त्यांच्यावर अनेकदा टीका झाली. त्यांची थट्टाही झाली. देवेगौडांना स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर हिंदीत भाषण द्यावे लागले होते. देवेगौडा बिहार आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांमुळे हिंदीत भाषण देण्यासाठी तयार झाले होते. त्याच दिवशी हिंदीचे राजकारण यशस्वी झाले होते. दुसरीकडे, काँग्रेस नेते पी. चिंदबरम ट्विट करत म्हणाले, केंद्र सरकारचे बिगर हिंदी भाषिक कर्मचारी कामकाजासाठी हिंदी शिकतात. तर हिंदी भाषिक इंग्रजी का शिकत नाही?
केवळ २.१% तामिळ हिंदी बोलतात, देशात सर्वाधिक कमी
भाषिक हिंदी बोलणारे…
पंजाबी 49.9%
मराठी 38.4%
गुजराती 34.6%
ओडिया 16.8%
मल्याळम 15.3%
कन्नड़ 12.6%
तेलुगु 11.2%
बंगाली 10.1%
तामिळ 2.1%