breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

राज्यात माहिती-तंत्रज्ञान, पायाभूत क्षेत्रात पोर्तुगाल गुंतवणूक करणार

मुंबई – माहिती-तंत्रज्ञान, कम्युनिकेशनबरोबरच पायाभूत क्षेत्रात पोर्तुगाल महाराष्ट्रात गुुंतणूक करणार आहे. स्थानिक कंपन्यांसोबत समन्वय ठेवून राज्यात उद्योग विस्तार करण्याची त्यांची तयारीही असल्याची माहिती पोर्तुगालमधील एका शिष्टमंडळाने आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना दिली.

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्तुगालच्या भेटीच्यावेळी भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार देशातील राजकीय तसेच व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून पोर्तुगालचे एक शिष्टमंडळ मुंबईत आले होते. यावेळी शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली.

उद्योगवाढीसाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. माहिती, तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन क्षेत्रात पोर्तुगालची कामगिरी उत्तम असून उर्जा, रस्ते, रेल्वे, फार्मा आदी क्षेत्रात काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. तसेच स्थानिक कंपन्यांसोबत समन्वय ठेवून उद्योग विस्तार करण्याची तयारीही असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

भारत-पोर्तुगालने एकमेकांच्या सहकार्याने प्रगती साधावी, यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. भारतातील आयटी क्षेत्रातील कंपन्या जगभरात आपला विस्तार करण्यास इच्छुक असून त्यांना पोर्तुगालने देखील सहकार्य करावे, असे आवाहन देसाई यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button