breaking-newsपिंपरी / चिंचवड

रावेतमध्ये टेम्पोची मोपेड दुचाकीला धडक, दोघी बहिणींचा जागीच मृत्यू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

मोपेड दुचाकीवरून निघालेल्या दोन बहिणींना टेम्पोची जोरात धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघींचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 12) रात्री साडेदहाच्या सुमारास रावेत बीआरटी रोड येथे घडला.

शीतल अभिजित गिरमे (वय 31, रा. भोंडवे नगर, रावेत), सायली ज्ञानेश्वर हेगडे (वय 28, रा. नवी सांगवी) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. याप्रकरणी शीतल यांचे पती अभिजित वसंत गिरमे (वय 35) यांनी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक समाधान बाबू केंगले (वय 21, रा. परंदवाडी, सोमाटणे फाटा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मयत पत्नी शीतल आणि फिर्यादी यांची मेव्हणी सायली या दोघी नवी सांगवी येथून फिर्यादी यांच्या रावेत येथील घरी मोपेड दुचाकीवरून (एम एच 14 / डी क्यू 3506) जात होत्या.  रावेत बीआरटी रोडने जात असताना मस्के वस्तीकडे जाणा-या रस्त्याच्या कॉर्नरला एका टेम्पोने (एम एच 14 एच यु 5940) दुचाकीला धडक दिली. यामध्ये शीतल आणि सायली या दोघी गंभीर जखमी झाल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button