breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सफाई कर्मचा-यांमुळे स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहराची सुधारणा – नगरसेवक एकनाथ पवार

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवड शहराची स्वच्छ सर्वेक्षणात सुधारणा झाली आहे. आपले शहर देशात 24 वा तर राज्यात 7 वा क्रमांक आला आहे. हे श्रेय केवळ महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांचे आहे. त्यामुळे त्या सर्वांचे अभिनंदन करतो. पुढील वर्षी आणखी सुधारणा होईल, असे मत माजी सत्तारुढ पक्षनेते तथा नगरसेवक एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड शहराची स्वच्छ सर्व्हेक्षणात गेल्या तीन वर्षांपासून पिछाडीवर जात होते. यंदा सर्वेक्षणात सुधारणा झाली आहे. यामध्ये पालिकेचे सफाई कर्मचारी, आरोग्य अधिकारी, आयुक्तांचे अभिनंदन केले. तसेच पवार म्हणाले, मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराची घसरण झाली होती. यंदा त्यामध्ये मोठी सुधारणा झाली आहे. स्वच्छता कर्मचारी, महापालिका अधिका-यांनी चांगले काम केले आहे.

शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्थांनी देखील यासाठी योगदान दिले आहे. यामुळेच शहराचा देशात 24 वा क्रमांक आला. तर, राज्यात पिंपरी-चिंचवड शहर पहिल्या दहामध्ये येत 7 वा क्रमांक मिळाला आहे. हे गौरवास्पद असून स्वच्छता कर्मचा-यांचे मनापासून अभिनंदन करतो. कोरोनाच्या महामारीतही सफाई कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत.

पुढील वर्षात आणखी सुधारणा केल्या जातील. शहर पहिल्या पाचमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी सफाई कर्मचा-यांनी सत्ताधारी म्हणून कशाचीही कमतरता भासू देणार नाही. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याला आमचे प्राधान्य आहे. पुढीलवर्षी शहरवासीयांच्या सहकार्याने नक्कीच सर्वेक्षणात शहराचा नंबर आणखी उंचावलेला असेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button