सोहम सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने कोरोना योद्धा व एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
पिंपरी चिंचवड | पद्मश्री डॉ.रंगनाथन यांच्या जयंती निमीत्त सोहम सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने कोरोना योद्धा व एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सोमवारी (दि.09) संत तुकारामनगर, पिंपरी येथे हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमासाठी माजी महापौर व विद्यमान नगरसेवक योगेश बहल प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. माजी आमदार गौतम चाबूकस्वार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणारे वाय.सी.एम हाँस्पिटलचे डॉ. राजेंद्र वाबळे, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक पाटील, रूबी केअर विभाग प्रमुख डॉ.प्रविण पाटील, एम.एस.सर्जन डॉ.संदिप शेंडे, पोलीस उपनिरिक्षक चाटे, पोलीस उपनिरिक्षक अशोक कोकाटे, संत तुकाराम नगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण सुवर्णा, महाराष्ट्र राज्य महावितरण समितीचे सदस्य अभिजित गोफण, शिक्षण समिती माजी उपसभापती मायला खत्री, पी.डी.फाउंडेशन पिंपरी, संस्थापक अध्यक्ष औदूंबर कळसाईत यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच, सोहम अभ्यासिकेत अभ्यास करून पी.एस.आय झालेले संदिप भिताडे, अजिक्य शेटे व विरेंद्र बहल आर्किटेक्चर यांनी प्राविण्य मिळवले यांचा देखील सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गौतम चाबूकस्वार यांनी संस्थेला मदत केली.तेसेच, येत्या काळात संस्थेला योग्य ती मदत दिली जाईल असे सांगितले. योगेश बहल यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन दिले.
सोहम ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्तविक केले. ग्रंथालयाच्या पुढील विस्तारा बाबत माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप चौधरी यांनी तर, संस्थेचे सचिव प्रदिप बोरसे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर कांबळे, मायला खत्री, किरण सुवर्णा, गौरव चौधरी, मनोज सोनवणे, अनिल उपाध्ये, निर्मला नेरकर व वर्षा बोरसे यांनी सहकार्य केले.