breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सदाशिव बहिरवाडे क्रीडागंणाची दुरावस्था

पिंपरी-  चिंचवड शाहुनगर येथील सदाशिव बहिरवाडे क्रीडांगणाची दुरावस्था झाली आहे. तेथे खेळण्यास येणा-या खेळाडूंना विविध अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे क्रीडांगणाची  दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदाशिव बहिरवाडे क्रीडांगणाची संरक्षण जाळी तुटल्यामुळे त्या मैदानावर कोणीही केव्हाही कोठूनही ये-जा करु शकतो. त्यामुळे मैदानाबाहेर सुरक्षा भिंत उभारणे गरजेचे आहे. मैदानातील परिसरात स्वच्छतेअभावी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही टवाळखेर लोकांकडून मैदानाचा वापर दारु पिण्यासह इतर चुकीच्या गोष्टींसाठी केला जात आहे. मैदानाभोवती सर्वत्र दारुच्या बाटल्या, गुटखा, तंबाखू व सिगारेटची पाकिटे पडली असल्याचे दिसते. तसेच या मैदानावर सर्वत्र गवत उगवले असून रात्रीचे साप, उंदीर व घुशी सर्वत्र फिरत असतात. या मैदानावर खेळाडूंसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली नाही.
कोणत्याही मुलभूत सुविधा पुरवल्या जात नसल्याने खेळाडूंना अपुऱ्या साहित्य व सुविधांवर सराव करावा लागत आहे. तसेच त्यावेळी येथे नव्याने स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. मात्र, या स्वच्छतागृहाची स्वच्छता केली जात नसल्यामुळे ते वापरण्या योग्य राहिलेले नाही. त्यामुळे स्वच्छतागृहाची नियमीत स्वच्छता करणे गरजेचे आहे. सदाशिव बहिरवाडे क्रीडांगणाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी व तेथील विवीध समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी बच्छाव यांनी केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button