breaking-newsराष्ट्रिय
कर्नाटक – उद्या बहुमत सिद्ध करा, येडियुरप्पांना कोर्टाचे आदेश
नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभेत सत्ताधारी भाजप पक्षाने शनिवारी संध्याकाळी चार वाजता बहुमत सिद्ध करावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. बहुमत चाचणीसाठी वेळ हवाय, यामुळे ती सोमवारी घ्यावी ही भाजपची मागणी कोर्टाने फेटाळली आहे.
कर्नाटकात राज्यपाल वजूभाई वाला यांनी बुधवारी रात्री भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. मात्र, या निर्णयाविरोधात कॉंग्रेस आणि जनता दल सेक्यूलर पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावर आज सुनावणी झाली. भाजपाच्या वतीने ऍड. मुकुल रोहतगी, कॉंग्रेसच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी, केंद्र सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, जनता दल सेक्यूलरच्या वतीने कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली.