breaking-newsपिंपरी / चिंचवड

सत्संग देवघर प्रतिष्ठानमार्फत केंद्र सरकारला १० कोटींचा मदतनिधी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

‘सत्संग देवघर प्रतिष्ठानामार्फत केंद्र सरकारला (PM CARES Fund) १० कोटींचा मदतनिधी उपलब्ध करून देण्यात आला. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्संग प्रतिष्ठानचे कौतुक व कृतज्ञता व्यक्त केली.

‘सत्संग देवघर’ या लोककल्याणकारी प्रतिष्ठानाची सत्संग पुणे ही सेवाभावी शाखा असून या शाखेमार्फत पुण्यातील सत्संगी गुरुबंधू व भगिनी आजच्या कोविड संकटात सरकारी नियमांचे काटेकोर पालन करीत पुणे व आसपासच्या परिसरातील अनेक कुटुंबांना आर्थिक व सेवा सहाय्य करत आहेत.

महाळुंगे येथील १० मजूर कुटुंबे, निखोजे (चाकण) खेडेगावातील २२ कुटुंबे, हिंजवडी येथील १०, बालेवाडी येथील १२, तर भोसरी भागातील ४ कुटुंबे यांच्यामार्फत निधी उपलब्ध केला. बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेले रोजंदारीवर काम करणारे मजूर, सुरक्षारक्षक तसेच घरकाम करून उदरनिर्वाह करणारे कष्टकरी अशा माणसांचा या कुटुंबांमध्ये समावेश आहे. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवताना पुणे सत्संगीयांनी आपल्या भोवतालच्या परिसर व समाज बांधवांबद्दल दाखवलेली संवेदनशीलता आणि या कोविडच्या संकटात ते एकटे नाहीत हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी उचललेली पावले आपल्या सर्वानाच प्रेरणादायी ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button