breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: राज्यातील 5 कारागृहे लॉकडाऊन

कारागृहात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील कारागृहे तातडीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे… गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली. या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह  ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात येत आहेत.

या संबंधित कारागृह अधिक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवाऱ्याची व्यवस्था आतच करण्यात यावी. मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

तसेच कारागृहात काम करणार्‍या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण भासली त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधावा. यामुळे त्यांच्या अडीअडचणींचे निराकरण करता येईल… अशा सूचना संबंधित कारागृहांना करण्यात आलेल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button