breaking-newsपुणेमहाराष्ट्र

जमावाची दगडफेक

  • पीएमपील, एसटी बसचे नुकसान : जमावाविरोधीत गुन्हा दाखल 

पुणे – भरधाव पीएमपीएलच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने जमावाने रस्त्यावरील एसटी बस आणि पीएमपीएलवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे बंडगार्डन येथे काही काळ गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. घटनास्थळी पोलीस पाहोचेपर्यंत जमावाने सहा एसटी बस आणि सहा पीएमपीएलवर दगडपफेक करून मोठे नुकसान केले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शाहबाज महम्मद इसाक बागवान (वय 55) असे ठार झालेल्याचे नाव आहे. मोहसिन शफी शेख (वय 32, रा. चंदननगर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पीएमपीएल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक केलेली नाही. फिर्यादी शेख यांचे मावस भाऊ शाहबाज महम्मद इसाक बागवान (वय 28) हे त्यांचे वडील महम्मद बागवान यांना दुचाकीवर बसवून पुणे स्टेशनकडून चंदननगरकडे जात होते. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास बंडगार्डन येथे सेंट्रल मॉलसमोर भरधाव पीएलपीएलने बागवान यांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शाहबाज यांचा जागीच मृत्यू झाला.तर, त्यांचे वडील गंभीर जखमी झाले. हा अपघात झाल्यानंतर बंडगार्डन रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने परिसरात रहाणाऱ्या संतप्त जमावाने अचानक पीएमपीएल बसवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. आधीच वाहतूक कोंडी झालेली असताना त्यान दगडफेक सुरू झाल्याने दहशत पसरली. जमावाने 12 एसटी बस आणि पीएमपीएल बसेचे नुकसान केले. या प्रकरणात जमावा विरोधातही गुन्हा दाखल केला आहे, असे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक अरूण गौड करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button