breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सचिन तेंडुलकर म्हणतोय, ताडोबा अभयारण्यात ‘मी पुन्हा येईन’

मुंबई |महाईन्यूज|

विधानसभा निवडणुकीत मी पुन्हा येईन, हे वाक्य खुपच चर्चेत राहिलं आहे. आताही चर्चा होतेय ती ‘मी पुन्हा येईन’चीच…. पण, यावेळी निमित्त मात्र वेगळं आहे. हे निमित्त आहे ते म्हणजे मास्टर ब्लास्टर, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या जंगल सफारीचं.

काही दिवसांपूर्वीच सचिन ताडोबा येथे दाखल झाला. आपल्या व्यग्र दिनचर्येतून वेळ काढत मास्तर ब्लास्टर तेथे आल्यामुळे त्याला पाहण्यासाठीही अनेकंनीच गर्दी केली, याच गर्दीतून वाट काढत सचिनही जंगलाच्या या वाटांवर निघाला वाघोबांची एक झलक टीपण्यासाठी.

सचिनने त्याच्या ताडोबा सफरीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्याला एका वाघिणीसह तिचे ४ बछडे दिसल्याचंही सांगितलं आहे.  ” मला ताडोबा अभयारण्यात अविस्मरणीय अनुभव आला. आम्हाला वाघिण आणि चार बछडे पाहायला मिळाले. ते जवळपास ४५ मिनिटं आमच्या समोर खेळत होते. अशा प्रकारचे अनुभव फार कमी मिळतात.

ही गोष्ट शक्य होते ती या अभयारण्याचे संरक्षण आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे” असं म्हणत त्याने व्हिडिओ पोस्ट केला आहे. शिवाय या अभयारण्यात पुन्हा येण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. तेव्हा आता मी पुन्हा येईन, असं म्हणणारा हा मास्टर ब्लास्टर पुन्हा केव्हा या सफारीसाठी येतो, याकडेच साऱ्यांचं लक्ष असेल. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button