breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बांगलादेशी घुसखोरांनो ‘तुमच्या देशात निघून जा’, मनसेचा इशारा

मुंबई |महाईन्यूज|

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात एल्गार पुकारलेल्या मनसेनं मोर्चाची मोर्चेबांधणी ही चांगलीच सुरू केली. मुंबई आणि पनवेल परिसरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बांगलादेशी घुसखोऱ्यांना देशातून निघून जाण्याचा इशारा दिला आहे. वर्सोवा आणि पनवेल्याच्या काही भागात असे पोस्टर पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (वर्सोवा विधानसभा) वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना मनसे इशारा, तुमच्या देशात निघून जा’ असं पोस्टरवर मराठीत लिहिण्यात आलं आहे.  वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना ‘मनसे’ने इशारा देत तुमच्या देशात निघून जा… अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आलेत. मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि उपविभाग अध्यक्ष अशोक पाटील यांची पोस्टरवर नावं आहेत. पनवेलमधील पदाधिकाऱ्यांनी बांगलादेशी नागरिकांना निर्वाणीचा ‘मनसे’ इशारा देत चालते व्हा… नाहीतर मनसे स्टाइल धडा शिकवला जाईल; अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button