#CoronaVirus: दिव्याऐवजी पेटवली सिगारेट, राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत
आपल्या चित्रपटांसोबतच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला रविवारी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट बंद करत नऊ मिनिटांसाठी दिवा लावून एकतेचं दर्शन घडवण्याचं आवाहन केलं होतं.
9 PM Disclaimer : Not following Corona warnings is far more dangerous than not following government warnings on cigarette smoking pic.twitter.com/Few9fyXhOg
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 5, 2020
मोदींनी केलल्या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. सामान्य जनतेसह अनेक बॉलिवूडमधील मंडळींनीही आपल्या घराच्या गॅलरी, खिडकी, दरवाजात दिवा लावून एकतेचा संदेश दिला. काही कलाकरांनी दिवे लावतानाचे आपले फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले. पण, दिग्दर्शक राम गोपाल वर्माने मात्र जरा वेगळाच फोटो पोस्ट केला. त्यामुळे राम गोपाल वर्माची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.