breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘संततधार’पावसाने धरणसाठ्यात वाढ

पुणे –  पुणे शहर आणि जिल्ह्यातील धरणांमध्ये संततधार असल्याने धरणांचा पाणीसाठा तीन अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. त्यामुळे दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे.

टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या परिसरात पावसाने जोर धरला आहे. टेमघर धरणात दिवसभरात ७३ मिलिमीटर, वरसगावमध्ये ४५ मिलिमीटर, पानशेतमध्ये ४३ मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला धरणात तुलनेने पावसाचे प्रमाण कमी आहे. या धरण क्षेत्रात आठ मिलिमीटर पाऊस पडल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात चोवीस तासात 90 मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे 2.33 टक्के पाणीसाठ्यात वाढ होवून धरणात 17.43 टक्के पाणी साठा झाला आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांमध्येही पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील २३ धरणांपैकी घोड धरण क्षेत्रांत सोमवारी पावसाने विश्रांती घेतली. अन्य धरणांमध्ये पावसाने हजेरी लावली. निरा-देवघर धरणात ६७ मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर वडिवळे धरणात ५१ मिलिमीटर, गुंजवणी धरणात ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अन्य धरणांमध्ये सरासरी दहा ते २० मिलिमीटर या दरम्यान पाऊस झाल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

‘उजनी’त पावसाचा जोर वाढला

उजनी धरण क्षेत्रात आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, सोमवारी पावसाने जोर धरला. दिवसभरात सुमारे १८ मिलिमीटर पाऊस पडला. या धरणात अद्याप उपयुक्त पाणीसाठा उणे ३१.६१ टीएमसी आहे. धरणावर पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतीसह अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना, औद्योगित क्षेत्र अवलंबून आहे.

धरणे पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

टेमघर ०.००

वरसगाव ०.८१

पानशेत १.६७

खडकवासला ०.४९

पिंपळगाव जोगे ०.००

माणिकडोह ०.१२

येडगाव ०.००

वडज ०.००

डिंभे ०.१७

घोड ०.००

विसापूर ०.०२

कळमोडी ०.३३

चासकमान ०.३१

भामा-आसखेड ०.७१

वडीवळे ०.३६

आंद्रा १.०४

पवना 2.33

कासारसाई ०.०६

गुंजवणी ०.३८

निरा-देवघर ०.८४

भाटघर १.५४

वीर ०.६६

नाझरे ०.००

उजनी – ३१.६१

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button