breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

#CoronaVirus: इस्रायलने करुन दाखवलं! कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर

करोना व्हायरसविरोधात लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने करोना व्हायरस अ‍ॅंटीबॉडी किंवा पॅसिव्ह लस विकसित करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. जेरुसलेम पोस्टने हे वृत्त दिले आहे. करोना विरोधात लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्वाच्या टप्प्यावर पोहोचल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली.

अँटीबॉडी व्हायरसवर हल्ला करुन व्हायरसला शरीरामध्येच संपवून टाकतात अशी माहिती संशोधकांच्या टीमने इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांना दिली. इन्स्टिट्यूट आता अ‍ॅंटीबॉडीसाठी पेटंट मिळवण्याबरोबरच व्यावसायिक निर्मितीसाठी काँन्ट्रॅक्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. बिझनेस स्टॅंडर्डने हे वृत्त दिले आहे.

‘बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट स्टाफने महत्वपूर्ण यश मिळवले असून त्यांचा आम्हाला अभिमान आहे’ असे संरक्षण मंत्री नाफताली बेन्नेट म्हणाले. ‘ज्युंची कल्पकता आणि हुशारीमुळे हे साध्य झाले’ असे बेन्नेट म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button