breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संग्राम तावडे यांची सेवादलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड

पिंपरी – निष्ठा, सेवा, त्याग, अनुशासन या सेवादलाच्या मुल्यांची जपवणूक करीत कायम कॉंग्रेसचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्य करणा-या संग्राम तावडे यांना कॉग्रेसने चांगल्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे शहर कॉंग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉग्रेस पक्ष नेहमीच सर्व सामान्य कार्यकर्त्यांना देखील योग्यवेळी संधी देतो. हे यातून पुन्हा एकदा सिध्द झाले आहे, असे कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले.

 

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष संग्राम चंद्रकांत तावडे यांची ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटी सेवादलाच्या राष्ट्रीय सहसचिव पदावर निवड करण्यात आली आहे. सेवादलाचे राष्ट्रीय सचिव अशोक गेहलोत यांनी तावडे यांना 6 ऑगस्ट रोजी पत्र दिले. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी तावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी प्रदेश  महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मयुर जैयस्वाल, क्षितीज गायकवाड, मकर यादव, अनिरुध्द कांबळे, किशोर कळसकर, भास्कर नारखेडे, पांडूरंग जगताप, हिरा जाधव, कलिंदर शेख, शितल कोतवाल, सायरा शेख, संतोष रणशिंग आदी उपस्थित होते.

 

कॉंग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि शहराध्यक्ष सचिन साठे यांचा खंदा समर्थक अशी ओळख असलेले व्यवसायाने अभियंता असणारे संग्राम तावडे यांनी मागील 20 वर्षांपासून कॉंग्रेसच्या विविध पदांवर काम केले आहे. नुकतीच त्यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीतही निवड झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button