breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मराठीत बोलण्याची मागणी केल्याने दुकानदाराकडून अपमान; लेखिकेचे ठिय्या आंदोलन

मुंबई – मराठीत बोलण्याची मागणी केल्याने दुकानदाराने अपमान केला म्हणून मुंबईतील कुलाबा परिसरात एका लेखिकेने गुरुवारी दुपारपासून दुकानाबाहेर रस्त्यावर ठिय्या दिला. शोभा रजनीकांत देशपांडे असे या लेखिकेचे नाव असून त्या कुलाब्यातच राहतात. मराठीत बोलण्याची मागणी केल्याने ज्वेलरने अपमानास्पद वागणूक देत दुकानाबाहेर ढकलून दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुलाब्यासारख्या दक्षिण मुंबईतील मराठमोळ्या उच्चभ्रू भागात हा प्रकार उघडकीस आला आहे.

‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई केली, पोलिसांना बोलवून अपमानित केले, असा आरोप करत शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला. दुकानदार आणि पोलिसांनी दुकानाबाहेर काढल्यावरून देशपांडे काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून दुकानासमोर ठाण मांडून बसल्या. पोलीस आयुक्त स्वतः जोपर्यंत येत नाहीत आणि दुकानदार परवाना दाखवत नाही, तोपर्यंत दुकानासमोरुन न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत त्या एकाच जागी ठिय्या मांडून बसल्या होत्या. दरम्यान, शोभा देशपांडे यांचे वय 75 हून अधिक असून त्या अन्नपाण्याविना एकाच जागी जवळपास सात तासाहून अधिक काळ आंदोलन करत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शोभा देशपांडे यांचे मराठी भाषेवर अतोनात प्रेम असून त्या मराठीचा नेहमी आग्रह धरत असतात. त्यातूनच महावीर ज्वेलर्स दुकानाच्या गुजराती मालकासोबत त्यांचे खटके उडाले. मराठी माणसाचा अपमान केला गेला म्हणून आंदोलन करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button