breaking-newsपुणे

संकल्प युथ फौउंडेशनने ‘एचआयव्ही’बाधितांना मिळवून दिले जीवनाचे जोडीदार

सोलापूर – एचआयव्ही बाधितांना  सन्मानाने जगता यावे, एचआयव्ही म्हणजे शेवट नव्हे; एकमेकांच्या साथीने सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगता आले पाहिजे, यासाठी सोलापुरातील संकल्प युथ फाउंडेशनच्या किरण लोंढे यांनी वधू – वर मेळावे, बाधित मुलांना दत्तक घेण्यासह आजपर्यंत विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

एचआयव्ही बाधितांसाठी जनजागृती होत असली तरी समाजाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला नाही. लहान वयातच जर एचआयव्हीची लागण झाली असेल, तर त्यांना एकट्यानेच आयुष्य कंठणे क्रमप्राप्त होते. यामुळेच वधू-वर मेळावा, दत्तक मुले, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी घेतलेला पुढाकार संकल्प युथ फाउंडेशन या संस्थेमुळे एड्सबाधितांना आधार प्राप्त झाला आहे. याबाबत बोलताना किरण लोंढे म्हणाले की, वंचित व एचआयव्ही बाधितांसाठी २०१५ साली संकल्प युथ फाउंडेशनची स्थापना केली. ओंकार साठे, सूरज भोसले, पूजा काटकर, श्रद्धा राऊळ, आकाश धोत्रे, नितेश फुलारी, विजय वाघमोडे आदींच्या सहकार्याने या संस्थेने आजपर्यंत विविध एचआयव्ही बाधितांसाठी विविध उपक्रम हाती घेऊन विधायक काम हाती घेतले़ सुरुवातीला बाधितांसाठी काम करताना अनेक अडचणी आल्या़ त्यानुसार समाजाचा दृष्टिकोन बदलू लागला तशी संस्थेला मदत करणाºयांची संख्या देखील वाढू लागली़ आज संस्थेच्या या सुरू असलेल्या कामाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात असल्याचेही लोंढे यांनी सांगितले.

वधू-वर मेळाव्याला प्रतिसाद
संकल्प युथ फाउंडेशनच्या वतीने १४ फेबु्रवारी २०१८ रोजी एचआयव्ही बाधितांसाठी वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले होते़ या मेळाव्यात ३० वर्षांखालील १६८ वधू-वर सहभागी झाले होते़ यात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांतील लोक सहभागी झाले होते़ या मेळाव्यात ६ विवाह जमविण्यात आले होत्े. त्यापैकी ३ वधू-वरांचा विवाह संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून झाला आहे़ उर्वरित वधू-वरांचा विवाह लवकरच होणार आहे़

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button