breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीगोंद्यात काँग्रेस आघाडीचा नगराध्यक्ष ; भाजपचा ‘गड आला पण सिंह गेला’

अहमदनगर – नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीत भाजपची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे. पालिकेच्या १९ जागांपैकी ११ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले, मात्र नगराध्यक्षपदी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी पोटे यांनी भाजपच्या सुनीता शिंदे यांच्यावर २१०० मतांनी मात केली.

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारी रोजी मतदान झाले .२३ हजार ६०४ मतदारांपैकी १९ हजार ८५२ मतदारांनी हक्क बजावला. एकूण ८४ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांचा उत्साह पहावयास मिळाला. जवळपास सर्वच मतदान केंद्रावर उशिरापर्यंत रांगा दिसत होत्या.

सोमवारी सकाळी निकाल प्रक्रिया सुरु झाली. नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस होती. मोजणीत आघाडीच्या शुभांगी पोटे या भाजपाच्या सुनिता शिंदे यांच्यापेक्षा २१०० अधिक मते घेत निवडून आल्या. तर नगरसेवकपदासाठी १९ प्रभागात ७१ उमेदवार रिंगणात होते. त्यात भाजपाचे ११ तर आघाडीचे ८ उमेदवार निवडून आले.

भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आघाडीच्या नेत्यांसाठी निवडणूक आस्तित्वाची लढाई होती. नगराध्यक्षपदासाठी खरी लढाई तीन उमेदवारांत पहावयास मिळाली. भाजपाच्या सुनिता शिंदे, संभाजी ब्रिगेडच्या सिराज बी कुरेशी आघाडीच्या शुभांगी पोटे यांच्या तिरंगी लढतीत आघाडीच्या पोटे यांनी बाजी मारली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button