breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयदेश-विदेशपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा ही आनंदाची बाब: चेतन बेंद्रे

पिंपरी : ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला ही आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी दिली.

चेतन बेंद्रे म्हणाले की, जनतेच्या अपेक्षांचे व्हिजन डाक्युमेंट दिल्ली, पंजाब राज्यामध्ये यशस्वीपणे राबवण्यात आम आदमी पक्षाची सरकारे यशस्वी झाली आहेत.
दिल्ली,पंजाब,गुजरात,गोवा या चार राज्यात १६१ आमदार व संसदेत १० खासदार आमच्या पक्षाचे आहेत.राष्ट्रीय पक्षासाठी आवश्यक संविधानिक तरतुदीची पूर्तता,जनतेचा विश्वास,सलग १० वर्षे अविरत संघर्ष केंद्र सरकारची दडपशाही सहन करून कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे.त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे, असेही बेंद्रे यांनी म्हटले आहे.

आप आमदार, खासदार संख्या बळ:

आमदार
दिल्ली : 62
पंजाब : 92
गुजरात : 5
गोवा : 2

राज्यसभा खासदार : 10

आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष बनला आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत घोषणा केली आहे.आम आदमी पार्टीची स्थापना 26 नोव्हेंबर 2012 रोजी झाली. 10 एप्रिल 2023 रोजी “आप”ला राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता “आप”चे निवडणूक चिन्ह झाडू हे संपूर्ण देशात फक्त “आप”साठी राखीव आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button