breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांचे शुक्लकाष्ट संपता संपेना; वीमा योजना कंपनीसाठी की शेतकऱ्यांसाठी ?: आदित्य वने

बळीराजा पीक विम्याच्या प्रतीक्षेत : पैठण तालुक्याला तूर पीक विम्यातून वगळले

पाठण । महाईन्यूज । प्रतिनिधी

राज्यातील सरकारने आश्वासने देवूनही शेतकऱ्यांचे शुक्लकाष्ट संपता संपत नाही. पीक विम्याने पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. नुकसान भरपाईची रक्कमही पदरी पडलेली नाही. दुसरीकडे पाठण तालुक्यातील शेतकऱ्यांना तूर पीक वीमा योजेतून वगळले आहे. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, राज्य सरकारने तात्काळ कार्यवाही करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी रयत शेतकरी संघटनचे युवक तालुका अध्यक्ष आदित्य बने आणि डॉ. शरीफ पठाण यांनी केली आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान फसल बीमा योजनेंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजना राबविली जाते. त्याबाबतचा शासन आदेश नुकताच जाहीर केला आहे. मात्र, त्यामध्ये यंदाच्या वर्षी नव्याने घातलेल्या ट्रिगर चा फटका राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. विशेष म्हणजे, सलग तीन वर्षासाठी ही योजना असेल असेही शासनाने त्यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे ही योजना कंपन्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोविड-19 च्या कालावधीमध्ये मतदार संघातील शेतकऱ्यांचा हरभरा, तूर, मका खरेदी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळणे, पीक विमा, प्रधानमंत्री किसान योजनेमधील रक्कम खात्यात जमा न होणे, पीक कर्जाच्या अटी बद्दल शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अवकाळीची नुकसान भारपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे.

दरम्यान, पाठण  तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या दुष्काळग्रस्त, गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, रेशनकार्ड मधील बरीच नावे आरसी मधून कमी झाले असून ते त्वरित समाविष्ट करण्यात यावे. प्रधानमंत्री किसान योजनेमधील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये लाभाचे पैसे, पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावा. गारपिटीमध्ये फळबागेची झालेली नुकसान भरपाई फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करण्यात यावी, पीककर्जा करिता शेतकऱ्यांना बँकेने ज्या अटी घातल्या आहेत त्या अटिची कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्तता करणे शक्य नसल्याने त्या शिथिल केल्या पाहिजेत, अशी मागणीही आदित्य वने यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button