breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोना रुग्णांवर उपचार नाकारणा-या रुग्णालयांवर कठोर कारवाई करा – नामदेव ढाके

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजाराचा फैलाव रोखणेसाठी शासकीय व महापालिकेच्या रुग्णालयासोबतच काही खाजगी रुग्णालये देखील चांगली कामगीरी बजावत आहे. तसेच, या आजाराची लक्षणे लक्षात घेवुन जबाबदारीचे भान राखत त्यांचेकडुन चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्याचे काम सुरु आहे. परंतु शहरातील काही खाजगी रुग्णालये स्टाफ व बेड शिल्लक नाही, डॉक्टर उपलब्ध नाही, अशी कारणे सांगुन कोरोना रुग्णांना उपचारास नकार देत असल्याच्या काही घटना निदर्शनास आल्या आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावात खाजगी रुग्णालयांनी शासकीय व पालिका रुग्णालयाप्रमाणे आपले कर्तव्य लक्षात घेवुन रुग्णसेवा देणे बंधनकारक असताना कोरोना संशयीत रुग्णांवर खाजगी रुग्णालयांनी उपचार नाकारणे हा प्रकार योग्य नाही. वास्तविक पाहता अशा कोरोना संशयीत रुग्णांचे मनोधैर्य वाढविणे हे देखील खाजगी रुग्णालयाचे कर्तव्य आहे. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” आहे. मात्र, कोरोनाकाळात काही खाजगी रुग्णालयांना या ब्रिदवाक्याचा विसर पडला आहे, अशी शंका पक्षनेते नामदेव ढाके यांनी घेतली आहे.  

शासनाकडुन कोविड-१९ रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयातील ८०% बेड आरक्षित करण्याचे आदेश यापुर्वीच दिलेले आहेत. त्यासंदर्भात महापालिकेकडुन शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांच्या व्यवस्थापन प्रतिनिधींची बैठक बोलावुन बेड नियोजन संदर्भात तशा सुचना केल्या आहेत. परंतु काही खाजगी रुग्णालये या सुचनांचे पालन न करता काहीतरी कारणे देवुन याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन कोरोना वगळता इतर आजाराचे रुग्ण उपचारासाठी भरती करुन घेत आर्थिक हित जोपासत त्यांच्याकडुन रोख स्वरुपाची बीले वसुल करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, असेही ढाके यांनी म्हटले आहे.

शासनाने घालून दिलेल्या आदेशांची सर्रासपणे पायमल्ली होत असताना आढळून येते. अशा रुग्णालयांनी कोरोना महामारीच्या काळात आपले आर्थिक हित दुर ठेवुन शासनाला व महापालिकेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या या महामारीच्या काळात कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहु नये, यासाठी शहरातील खाजगी दवाखाने व रुग्णालये यांच्या ओपीडी सुरु असणे अत्यावश्यक आहे. माणूसकीच्या नात्याने ओपीडीच्या माध्यमातुन तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, अशा नियमांना फाटा देण्याचे काम काही ठिकाणी सुरु आहे.

कोरोना काळात सर्वांनी मिळून या महामारीला ऱोखण्याची गरज असुन त्याची मोठी जबाबदारी ही रुग्णालयांवर आहे. मात्र वरीलप्रमाणे काही घटना समोर येत असल्याने अशा रुग्णालयांवर कारवाई होणे आवश्यक आहे. जे खाजगी दवाखाने व रुग्णालये नागरिकांना कोणत्याही कारणास्तव उपचार करण्यास नकार अथवा त्यांचेवर उपचारास टाळाटाळ केल्याची बाब निदर्शनास आल्यास अशा खाजगी दवाखाने व रुग्णालयावर हॉस्पिटल आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, वेळप्रसंगी त्यांचे परवाने रद्द करावेत, अशा सुचना सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button