breaking-newsपिंपरी / चिंचवड

मोहननगर येथील कोविड रुग्णालयातील जेवण पुरविणा-या ठेकेदाराला पालिकेची नोटीस

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

मोहननगर येथील कामगार विमा योजना रुग्णालयामध्ये शहर मनसे व काही रुग्णांनी जेवणामध्ये अळ्या सापडल्याची तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन पालिकेने बिग ट्री रेस्टॉरंट अँण्ड बार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

त्यांचा जेवण व नाष्टा पुरविण्याचा ठेका ७ ऑगस्ट रोजी संपुष्टात आणण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही प्रस्तावीत केली आहे, असे पालिकेचे मध्यवर्ती भांडार विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांनी तक्रारदारांना कळविले आहे.

याबाबत सचिन चिखले म्हणाले की, कोविड रुग्णांवर महापालिकेसह खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. महापालिका कोविड रुग्णांसाठी लाखो रुपयांचा खर्च करत आहे. परंतु, प्रत्यक्षात रुग्णांना मात्र योग्य ती सेवा मिळत नाही. चिंचवडच्या मोहननगर येथील ईएसआय रुग्णालयात १०० कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या जेवणात एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा माश्या व आळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यास धोका पोहचू शकतो.

याची जाणीव झाल्याने मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने थेट मोहननगरच्या ईएसआय रुग्णालयात धाव घेऊन, येथील डॉक्टर व अधिकारी यांना फैलावर घेतले. तसेच महापालिका आयुक्तांची देखील चांगलीच कानउघडणी केली. तसेच त्यांना जेवणाचा दर्जा सुधारण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. अखेर मनसेच्या मागणीस यश आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button