breaking-newsमहाराष्ट्र

शेगावच्या सेंट्रल बँक शाखेत 1 कोटी 87 लाखांचा अपहार

बुलडाणा : जिल्ह्यातील शेगाव येथील सेंट्रल बँकेत खातेदारांनी ठेवलेल्या ठेवी, आणि खात्यातील रक्कम परस्पर पणे विड्रॉल करून 1 कोटी 87 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बैंकेच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांना अटक केली आहे. यामध्ये न्यायालयाने तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे अपहार प्रकरण उघडकीस आल्याने बँकेतील खातेदांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेमध्ये खातेदारांनी ठेवलेल्या ठेवी आणि खातेदारांच्या खात्यांमधील रकमा विड्रॉल होत असल्याचे तक्रारी बँकेकडे येत होत्या शिवाय ठेवलेल्या मुदत ठेवी मुदत पूर्ण झाल्यानंतर जेव्हा खातेदार ते तोडण्यासाठी बँकेत जात होते तेव्हा या ठेवी बँकेत जेव्हा ठेवण्यात आल्या तेव्हा विड्रॉल केल्याचे समोर येत होते. त्यामुळे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर शाखेचे ऑडिट केले वयामध्ये ते एक कोटी 87 लाख 290 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आल्याववरून सेंट्रल बँकचे अकोला विभागीय व्यवस्थापक विद्याधर डिगंबर पेंडणेकर यांनी शेगाव पोलिसात तक्रार नोंदवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button