breaking-news

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिकच्या कारागृहात मृत्यू

नाशिक : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी आणि टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमनचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात युसूफ मेमनने अखेरचा श्वास घेतला. टायगर मेमनचे दोन्ही भाऊ युसूफ मेमन आणि इसाक मेमन नाशिक कारागृहात शिक्षा बंदी होते. हृदयविकाराच्या झटक्याचा उपचार घेत असताना युसूफचा मृत्यू झाला. नाशिकच्या कारागृहात असल्याने युसूफचं शव विच्छेदन धुळे शासकीय महाविद्यालयात होणार आहे. 

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी युसूफला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण आजारपणामुळे युसूफला काही काळासाठी जेलबाहेर ठेवण्यात आलं होतं. आजारपणामुळे युसूफला जामिन मिळाला होता, पण या काळात युसूफ रुग्णालयातच राहिल, अशी अट ठेवण्यात आली होती. 

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनला याआधीच फाशी झाली आहे. तर मुंबई बॉम्बस्फोटाचे मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन अजूनही फरार आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button