breaking-newsपुणे

आम आदमी पार्टीचे पुण्यात ‘वीजबिल माफ करा’ आंदोलन

पुणे :कोरोना साथीच्या या भीषण संकटांच्या काळात सर्वत्र रोजगार बंद झाले आहेत. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, त्यामुळे लॉकडाऊन काळातील नागरिकांचे 200 युनिटपर्यंत मागील 4 महिन्याचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे या मागणीसाठी आम आदमी पक्ष पुणे तर्फे विद्युत कार्यालय, रास्ता पेठ येथे आज शुक्रवारी जोरदार आंदोलन करण्यात आले.

या महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनलेले आहे. केंद्र सरकारच्या पॅकेज सामान्य माणसाला कोणतीही थेट मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आता त्वरित राज्यातील नागरिकांचा आर्थिक ताण हलका करण्याच्या दृष्टीने पावले उचलून त्यांना दिलासा देणे गरजेचे बनले आहे. या साठीचे मागणी पत्र स्थानिक विद्युत अभियंता यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे नावे पत्र देण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button