breaking-newsव्यापार

शेअर बाजार तेजी; सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला तर निफ्टीत 300 अंकांची वाढ

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ या अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. भारताच्या सकल आर्थिक उत्पन्नाच्या 10 टक्के एवढं हे पॅकेज आहे.  या विषेश पॅकेजच्या घोषणेचा परिणाम आज थेट भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला. दिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सरुवातीला प्री ओपन ट्रेड मध्ये सेन्सेक्स 1600 अंकांपेक्षा जास्त तर निफ्टी 468 अंकांनी सुरुवात झाली.

जगभरात मृत्यूतांडवासाठी कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरसनं आता अर्थव्यवस्था पोखरायला सुरुवात केली आहे. जगभरातल्या शेअर बाजाराप्रमाणे भारतीय शेअर बाजार गेले काही दिवस कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. आज मात्र शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली.

शेअर बाजारात तेजी

आज सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारलेला पाहायला मिळाला. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 962.06 अंकांनी म्हणजेच 3.07 टक्क्यांनी वधारत 32,333.18 वर बाजाराला सुरुवात झाली. सुरुवातील निफ्टीमध्ये 315.85 अंकांनी म्हणजे 3.43 टक्क्यांनी वधारत 9512 वर बाजाराला सुरुवात झाली.

निफ्टीमध्ये प्रचंड तेजी

आज बाजारात निफ्टीमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली. निफ्टी 50 मधील 49 शेअर्स बाजारात हिरव्या निशाणीसह व्यापार करीत होते. केवळ नेस्लेच्या शेअर्समध्ये 0.43 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली.

निफ्टीचे वधारलेले शेअर्स

  • वेदांता 10 टक्के
  • आयसीआयसीआय बँक 8 टक्के
  • मारुती 7.12 टक्के
  • इंडसलंड बँक 6.76 टक्के
  • अ‌ॅक्सिस बँक 6.48 टक्के
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button