breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संगमनेरमध्ये सुजय विखेंचे बॅनर फाडले

शिर्डी – अहमदनगरमधील नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांच्या अभिनंदनाचे बॅनर फाडण्यात आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतरही नगरमधील राजकीय संघर्ष सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.

संगमनेर इथं सुजय विखे आणि शिर्डीतील खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर अज्ञातांनी हे बॅनर फाडून टाकले आहेत. त्यामुळे संगमनेरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डी आणि नगरमधील यंदाची लोकसभा निवडणूक गाजली ती विखे आणि थोरात यांच्यातील वादाने. या दोन्ही जागा युतीला जिंकून देत या राजकीय संघर्षात राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाजी मारली आहे. विखेंचे सुपुत्र सुजय विखे यांनी नगर दक्षिण मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button