breaking-newsव्यापार

शेअर बाजारात मोठी घसरण

मुंबई – जागतिक बाजारातून आलेले नकारात्मक संकेत आणि नफा वसुलीसाठी बाजारात झालेला जोरदार विक्रीचा मारा यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४४० अंकांची आणि निफ्टीत १२४ अंकांची घसरण झाली होती. ॲक्सिस बँकेची आज बाजारात चांगलीच धुलाई झाली. कच्च्या तेलाच्या भावावरही आज दबाव होता. मागणीत घट झाल्यामुळे ब्रेंट क्रूडचा भाव एक महिन्याच्या निचांकावर गेला आहे. डॉलरमध्ये कमजोरी आल्यामुळे मेटल क्षेत्रात आज तेजीचे वातावरण होते.

शेअर बाजारात आज सकाळपासूनच समभागांच्या विक्रीचा दबाव वाढला होता. त्यामुळे निर्देशांकात मोठी घसरण झाली होती. कमॉडीटी बाजारातही सकाळी सोन्याचा भाव वधारला होता. मात्र नंतर डॉलरमध्ये झालेली घसरण आणि नफा वसुलीची विक्री यामुळे सोन्याच्या भावात घसरण झाली. शेअर बाजारातही आज नफा वसुलीच्या विक्रीचा जोर वाढला होता. त्यामुळे आयटीसी, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, यूपीएल आणि एचडीएफसी या कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली होती. विक्रीचा दबाव असलेल्या शेअर बाजारात भारती इन्फ्राटेल, मारुती सुझुकी, झी एंटरटेन्मेंट, टाटा मोटर्स, आणि टीसीएस यांच्या समभागांमध्ये वाढ झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button