breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 63 जणांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणा-या 63 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि.3) कारवाई केलेली आहे. संबंधित नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केलेली आहे. टाळेबंदीच्या आदेशाच्या नियमांमधून टप्प्याटप्प्यात शिथिलता देण्यात येत आहे. त्यांमुळे शहरातील सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. तीन सप्टेंबर पासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपी बस सेवा देखील सुरु करण्यात आलेली आहे. अनेक दुकाने उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली आहे.

ही शिथिलता देत असतानाच काही नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-यांवर कारवाई करणे, सामाजिक अंतर तसेच गर्दी करून कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक वातावरण तयार करणा-यांवर कारवाई केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधीतांची आकडेवाडी हजारोंच्या संख्येने दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button