breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे ड्रोनद्वारे होणार सर्व्हेक्षण

पिंपरी | महाईन्यूज |

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो कामास अवैध बांधकामे, अतिक्रमण आणि बाधित जमिनीचा अडथळा ठरू नये, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रथमच शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू केले असून, डिसेंबरअखेर ते पूर्ण होईल.

पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडने सर्वेक्षणाच्या कामासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. या सर्वेक्षणासाठी विशेष कॅमेऱ्यांचा वापर केला आहे. त्यातून जमिनीची सीमा आखणी करण्यास मदत होणार आहे. पुणे आणि पिंपरी पोलिस आयुक्तालयाच्या परवानगीने सर्वेक्षण होणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांनी दिली.

या सर्वेक्षणानंतर तांत्रिक कामास सुरुवात होणार आहे. या मार्गिकेवर २३ स्टेशनचा समावेश असेल. त्यात माण, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडिअम, हायस्ट्रिट, रामनगर, हायस्ट्रीट, बालेवाडी फाटा, बाणेर, बाणेर, कृषी अनुसंधान, यशदा, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, आरबीआय, कृषी महाविद्यालय, जिल्हा न्यायालय याचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button