breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनमध्ये राहायची भूक लागलेली आहे- संजय निरूपम

मुंबई: भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून जनताही संभ्रमात आहेत. या भेटीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नाव न घेता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीका केलेली आहे.

‘शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनमध्ये राहायची भूक लागली आहे’ असे म्हणत त्यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. संजय निरूपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘असं वाटतं की शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्यांनाच खाते. ही दुर्भावना नसून वास्तविकता आहे’.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button