breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खेळ नाही, उत्पन्न नाही, आता करायचे काय?

एरवी लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकाला आनंद देणारे सर्कशीतील कलाकार आणि प्राणी सध्या अडचणीत सापडले आहेत. संचारबंदीमुळे खेळ नाही, त्यामुळे उत्पन्न नाही आणि उत्पन्न नसल्याने कलाकारांच्या-प्राण्यांच्या खाण्यापिण्याचे, वेतनाचे काय करायचे असे प्रश्न सर्कसचालकांसमोर निर्माण झाले आहेत. काही संस्था-संघटनांच्या मदतीवर सर्कशीतील कलाकार आणि प्राण्यांना दिवस काढावे लागत आहेत.

करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र शासनाने देशभरात २१ दिवसांची संचारबंदी लागू के ली आहे. सर्वसाधारणपणे मार्चच्या अखेरीपासून सुरू होणाऱ्या सुटय़ा डोळ्यासमोर ठेवून खेळ लावण्याच्या तयारीत असलेल्या सर्कशींना या संचारबंदीचा फटका बसतो आहे. प्राणी आणि कलाकारांचा मोठा लवाजमा असणाऱ्या सर्कशींसमोर या संचारबंदीमुळे आता असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. देशभरातील संसर्गाची परिस्थिती दूर होऊन जनजीवन पूर्वपदावर कधी येणार, याचीच त्यांना प्रतीक्षा आहे.

पुण्याजवळील वाघोली येथे असलेल्या ग्रेट भारत सर्कसचे उमेश आगाशे म्हणाले, की संचारबंदीमुळे खेळ करता येत नाहीत. आमच्याकडे एकू ण १०५ जण काम करतात. संचारबंदी लागू झाल्यावर त्यातील काही पळून गेले. काही जण रीतसर सांगून त्यांच्या गावी निघून गेले. काही जण छत्तीसगढ आणि अन्य ठिकाणी अडकले आहेत.  सर्कशीबरोबर सध्या ६५ जण आहेत. तर, प्राण्यांमध्ये १८ कु त्रे, २ उंट आणि २ घोडे आहेत. प्राण्यांसाठी काही संस्था आणि कार्यकर्त्यांकडून भुसा, चारा, गवत उपलब्ध झाले आहे. त्यामुळे काही दिवस जातील.  कलाकारांसाठी शिधा मिळत आहे. मात्र, हे असे किती दिवस चालणार, परिस्थिती कधी पूर्वपदावर येणार हा मोठा प्रश्न आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button