ताज्या घडामोडीराष्ट्रिय

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना १० वर्षांपूर्वीच्या हिंसाचार प्रकरणी एक वर्षाची शिक्षा

भोपाळ |  मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना १० वर्षांपूर्वीच्या हिंसाचार प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण २०११ मध्ये बीजेवायएमच्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याशी संबंधित आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह ६ जणांना इंदूर जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना एक वर्षाच्या शिक्षेसह ५ हजार दंडही ठोठावण्यात आला.

दिग्विजय सिंह यांचे म्हणणे आहे की, हे १० वर्षे जुने प्रकरण असून त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. यापूर्वी त्यांचे नाव एफआयआरमध्येही नव्हते. ‘राजकीय दबावाखाली माझे नाव जोडण्यात आले आहे. आता आम्ही या प्रकरणी अपील करणार आहोत’, असे त्यांनी म्हटले.

सध्या त्यांना जामीन मिळाला असून उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, १७ जुलै २०११ रोजी उज्जैनमध्ये भाजयुमो कार्यकर्ते जयंत राव यांनी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, त्यामुळे संतप्त दिग्विजय सिंह आणि बीजेवायएम कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. उज्जैन येथील माधव नगर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button