breaking-newsराष्ट्रिय

शिवसेनेचा केजरीवाल यांना पाठिंबा

नवी दिल्ली:  चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ‘आप’चे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिल्यानंतर आता केजरीवाल यांच्यासाठी शिवसेनाही मैदानात उतरली आहे. ‘केजरीवाल यांच्यासोबत जे होत आहे, ते लोकशाहीसाठी घातक आहे,’ असे म्हणत शिवसेनेने केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘केजरीवाल यांनी सुरू केलंलं आंदोलन अनोखं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत केजरीवाल यांच्याशी चर्चा केली आहे. केजरीवाल यांना जनतेने निवडून दिलं आहे. त्यांना काम करण्याचा अधिकार आहे. मात्र दुर्देवानं त्यांना जी काही वागणूक दिली जात आहे, ती चुकीची असून हा लोकशाहीसाठी मोठा धोका आहे,’ असं राऊत म्हणाले.

आयएएस अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यानंतर केजरीवाल यांनीही धरणं धरलं आहे. या आंदोलनाचा आज आठवा दिवस असून केंद्र सरकार आपल्याला काम करू देत नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. दरम्यान केजरीवाल यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आधीच पाठिंबा दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते,खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांनीही केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button